भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १४१ :
परकीय देशातून मुलीची किंवा मुलाची आयात करणे :
कलम : १४१
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : परकीय देशातून मुलीची किंवा मुलांची आयात करणे.
शिक्षा : १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
एकवीस वर्षे वयाखालील कोणत्याही मुलीवर किंवा अठारा वर्षे वयाखालील कोणत्याही मुलावर दुसऱ्या व्यक्तीशी विधिनिषिद्ध संभोग करण्याची बळजबरी करता यावी किंवा त्यासाठी फूस लावता यावी या उद्देशाने अथवा तिच्यावर तशी बळजबरी होईल किंवा तिला त्यासाठी फूस लावण्यात येईल असा संभव असल्याची स्वत:ला जाणीव असताना, जो कोणी भारताच्या बाहेरील कोणत्याही देशातून भारतात त्यांची आयात करील त्याला दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.