भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ११ :
एकान्त बंदिवास :
न्यायालयाला या संहितेखाली ज्या अपराधाबद्दल एखाद्या व्यक्तीला सश्रम कारावासाची (सक्तमजुरी) शिक्षा देण्याचा अधिकार आहे त्या अपराधाबद्दल जेव्हा केव्हा त्या व्यक्तीला सिद्धदोष ठरवण्यात येईल तेव्हा, न्यायालय त्याच्या शिक्षादेशाद्वारे असा आदेश देऊ शकेल की, अपराध्याला ज्या कारावासाची शिक्षा दिलेली असेल त्यापैकी कोणत्याही एका किंवां अनेक अंशकालापुरते – पण सर्व मिळून तीन महिन्यापेक्षा अधिक काळ नाही – पुढील प्रमाणानुसार त्याला एकांत बंदिवासात ठेवण्यात यावे, ते प्रमाण असे :-
(a) क) (अ) कारावासाची मुदत सहा महिन्यांपेक्षा अधिक नसेल तर जास्तीत जास्त एक महिना इतका काळ;
(b) ख) (ब) कारावासाची मुदत सहा महिन्यांपेक्षा जास्त असेल, तर एक वर्षापेक्षा अधिक नसेल तर जास्तीत जास्त दोन महिने इतका काळ;
(c) ग) (क) कारावासाची मुदत एक वर्षापेक्षा जास्त असेल, तर जास्तीत जास्त तीन महिने इतका काळ.