Bns 2023 कलम १०६ : निष्काळजीपणामुळे (हयगयीने) मृत्यूस कारण होणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १०६ :
निष्काळजीपणामुळे (हयगयीने) मृत्यूस कारण होणे :
कलम : १०६ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बेदरकारपणे किंवा हयगयीने केलेल्या कृतीमुळे मृत्यूस कारण होणे.
शिक्षा : ५ वर्षांचा कारावास आणि द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
अपराध : नोंदणीकृत वैद्यकिय व्यवसायिकाने बेदरकारपणे किंवा हयगयीने केलेल्या कृतीमुळे मृत्यूस कारण होणे.
शिक्षा : २ वर्षांचा कारावास आणि द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
१.(कलम : १०६ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बेदरकार किंवां हयगयीने (निष्काळजीपणाने) वाहन चालवून, कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूस कारण होणे आणि घटना स्थळावरुन पळून जाणे.
शिक्षा : १० वर्षांचा कारावास आणि द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.)
———
१) जो कोणी सदोष मनुष्यवध या सदरात न मोडणारी (नसलेला) कोणतीही बेदरकार किंवां हयगयीचे (निष्काळजीपणाचे) कृती करुन कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूस कारण होईल त्याला, पाच वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल आणि जर नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया करत असताना असे कृत्य केल्यास त्याला दोन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनासाठी, नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी म्हणजे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अधिनियम २०१९ (२०१९ चा ३०) अंतर्गत मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता असलेला आणि ज्याचे नाव त्या अधिनियमान्वये राष्ट्रीय वैद्यकिय रजिस्टर किंवा कोणत्याही राज्य वैद्यकिय रजिस्टर मध्ये प्रविष्ट केले आहे असा वैद्यकीय व्यवसायी.
२) जो कोणी सदोष मनुष्यवध या सदरान न मोडणारी (नसलेला) कोणतीही बेदरकार किंवां हयगयीने (निष्काळजीपणाने) वाहन चालवून, कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूस कारण होईल आणि घटना स्थळावरुन पळून जाईल किंवा घटनेच्या तत्काळ पश्चात्, पोलीस अधिकारी किंवा न्यायाधिशास घटनेची सूचना देण्यास कसूर करील, त्याला, दहा वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल.
———
१. १ जुलै २०२४, अधिसूचना क्रमांक एस. ओ. ८५० (ई), दिनांक २३ फेब्रुवारी २०२४, भारताचे राजपत्र, असाधारण, भाग २, कलम ३ (दोन) पहा.

Leave a Reply