शस्त्र अधिनियम १९५९
कलम ४६ :
१८७८ चा अधिनियम क्रमांक ११ याचे निरसन:
१) भारतीय शस्त्र अधिनियम, १८७८ (१८७८ चा ११) हा याद्वारे निरसित करण्यात आला आहे.
२) भारतीय शस्त्र अधिनियम, १८७८ (१८७८ चा ११) याचे निरसन झाले असले तरी आणि सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम, १८९७ (१८९७ चा १०) याची कलमे ६ व २४ यांच्या उपबंधास बाध न येता, प्रथम उल्लेख केलेल्या अधिनियमानुसार मंजूर केलेले किंवा नवीकरण केलेले आणि या अधिनियमाच्या प्रारंभाच्या निकटपूर्वी अंमलात असलेले प्रत्येक लायसन ज्याकरता ते मंजूर करण्यात किंवा नवीकृत करण्यात आले असेल अशा कलावाधीपैकी राहिलेल्या मुदतीपर्यंत- तत्पूर्वी ते प्रत्याहृत करण्यात आले नाही तर,-अशा प्रारंभानंतर अमलात असण्याचे चालू राहील.