शस्त्र अधिनियम १९५९
कलम ४३ :
प्रत्यायोजित करण्याची शक्ती :
१) कलम ४१ खालील शक्ती किंवा कलम ४४ खालील शक्ती वगळता या अधिनियमानुसार केंद्र शासनास वापरता येईल अशी कोणतीही शक्ती किंवा त्यास करता येईल असे एखादे कार्य असेल तेव्हा केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे असे निदेशित करू शकेल की, ते अधिसूचनेत विनिर्दिष्ट करील अशा कोणत्याही बाबींच्या संबंधात व अशा कोणत्याही शर्ती असल्यास त्यांच्या अधीनतेने, विनिर्दिष्ट करण्यात येईल,-
(a)क)(अ) असा केंद्र शासनास दुय्यम असलेला अधिकारी किंवा प्राधिकरण, किंवा
(b)ख)(ब) असे राज्य शासन किंवा त्या राज्यशासनास दुय्यम असलेला असा कोणताही अधिकारी किंवा प्राधिकरण.
यांना देखील ती शक्ती वापरता येईल किंवा ते कार्य करता येईल.
२) केंद्र शासनाने या अधिनियमानुसार केलेले कोणतेही नियम, कोणत्याही राज्य शासनाला किंवा त्यास दुय्यम अशा कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा प्राधिकरणाला ्रअधिकार प्रदान करू शकतील किंवा कर्तव्ये नेमून देऊ शकतील किंवा अधिकार प्रदान करण्याबाबत किंवा कर्तव्य नेमून देण्याबाबत प्राधिकृत करू शकतील.