शस्त्र अधिनियम १९५९
कलम २९ :
लायसन धारन न करणाऱ्या व्यक्तीकडून शस्त्रे इत्यादी जाणीवपूर्वक खरेदी करणे किंवा शस्त्रे इत्यादी कब्जात ठेवण्यास हक्कदार नसलेल्या व्यक्तीकडे ती जाणीवपूर्वक सुपूर्द करणे याबद्दल शिक्षा :
जो कोणी,-
(a)क)(अ) विहित करण्यात येईल अशा वर्गापैकी किंवा वर्णनाची कोणतीही अग्निशस्त्रे किंवा अन्य कोणतीही शस्त्रे अथवा कोणताही दारूगोळा अन्य एखाद्या व्यक्तीला कलम ५ खाली लायसन मिळालेले नाही किंवा प्राधिकृत करण्यात आलेले नाही हे माहीत असताना, अशा अन्य व्यक्तीकडून खरेदी करील; किंवा
(b)ख)(ब) कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा आपल्या कब्जात ठेवण्यास या अधिनियमाच्या किंवा त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याच्या आधारे अन्य एखादी व्यक्ती हक्कदार आहे आणि ती तशी कब्जात ठेवण्यास या अधिनियमाद्वारे किंवा अशा अन्य काद्याद्वारे तिला मनाई करण्यात आलेली नाही याची अगोदर खातरजमा केल्याशिवाय तिच्याकडे सुपूर्द करील.
तो १.(तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षास) पात्र होईल.
———
१. १९८३ चा अधिनिय क्रमांक २५ याच्या कलम २५ अन्वये (२२-६-१९८३ पासून) मुळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.