शस्त्र अधिनियम १९५९
१.(सन १९५९ चा अधिनियम क्रमांक ५४)
शस्त्रे व दारुगोळा यांच्याशी संबंधित असलेला कायदा एकत्रित व विशोधित करण्यासाठी अधिनियम
भारतीय गणराज्याच्या दहाव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
प्रकरण १ :
प्रारंभिक :
कलम १ :
संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :
१) या अधिनियमास शस्त्र अधिनियम, १९५९ असे म्हणावे.
२) याचा विस्तार संपूर्ण भारतभर आहे.
३) केंद्र शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करील अशा २.(दिनांकास) तो अंमलात येईल.
———
१. हा अधिनियम १९६२ चा विनियम १२, कलम ३ व अनुसूची यांद्वारे गोवा, दमणट व दीव यांवर १९६३ चा विनियम ६, कलम २ व अनुसूची १ याद्वारे दादरा व नगरहवेली यांवर (१ जुलै १९६५ रोजी व तेव्हापासून), १९६३ चा विनियम ७, कलम ३ व अनुसूची एक यांद्वारे पाँडेचेरीवर (१ ऑक्टोबर १९६३ रोजी व तेव्हापासून) आणि अधिसूचना क्रमांक जी. एस. आर ४६१ (ई), दिनांक २१ जुलै, १९७६ याद्वारे सिक्कीमवर विस्तारित करण्यात आला आहे.
२. १ ऑक्टोबर १९६२ – शासकीय अधिसूचना क्रमांक जी.एस.आर ९९२, दिनांक १३ जुलै, १९६२ गॅझेट ऑफ इंडिया १९६२ – भाग दोन, उपविभाग ३ (एक), पृष्ठ १०९२ पहा.
