शस्त्र अधिनियम १९५९
कलम १२ :
शस्त्रांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची किंवा त्यास मनाई करण्याची शक्ती :
१) केंद्र शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, –
(a)क)(अ) अधिसूचनेत विनिर्दष्ट करण्यात येईल अशा वर्गांची व अशा वर्णनांची शस्त्रे किंवा दारूगोळा यांची भारतामध्ये किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये वाहतूक करण्यासंबंधात, या अधिनियमाच्या व त्याखाली केलेल्या नियमांच्या उपबंधानुसार देण्यात आलेले लायसन धारण केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीने तसे करता कामा नये असा निदेश देऊ शकेल; किंवा
(b)ख)(ब) अशा वाहतुकीस संपूर्णपणष मनाई करू शकेल.
२) एखाद्या सागरी बंदराच्या कंवा हवाई बंदराच्या ठिकाणी शस्त्रे व दारूगोळा वाहनांतरित केली असता त्यांची या कलमाच्या अर्थानुसार वाहतूक केली असे होते.