भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५३१ :
निरसन व व्यावृत्ती :
१) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २ ) याद्वारे निरसित झाली आहे.
२) असे निरसन झाले असले तरीही,-
(a) क) (अ) ही संहिता जेव्हा अमलात येणार त्या दिनांकाच्या निकटपूर्वी जर कोणतेही अपील, अर्ज, संपरीक्षा, चौकशी किंवा अन्वेषण प्रलंबित असेल तर, प्रकरणपरत्वे, असे अपील, अर्ज संपरीक्षा, चौकशी किंवा अन्वेषण जणू काही ही संहिता अंमलात आलेली नसावी त्याप्रमाणे अशा प्रारंभाच्या निकटपूर्वी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) (यात यानंतर जुनी संहिता म्हणून निर्दिष्ट) जशी अमलात होती तिच्या उपबंधांनुसार निकालात काढले जाईल, चालू ठेवण्यात येईल किंवा करण्यात येईल :
(b) ख) (ब) जुन्या संहितेखाली प्रकाशित केलेल्या अधिसुचना, काढलेल्या उद्घोषणा, प्रदान केलेले अधिकार, विहित केलेले नमुने, निश्चित केलेल्या स्थानिक अधिकारिता, दिलेले शिक्षादेश व आदेश, केलेले नियम आणि केलेल्या नियुक्ती (विशेष दंडाधिकारी म्हणून नव्हे) हे या संहितेच्या प्रारंभाच्या निकटपूर्वी अमलात असेल ते ते सर्व या संहितेच्या समनुरूप उपबंधाखाली अनुक्रमे प्रकाशित केलेले, काढलेले, प्रदान केलेले, विहित केलेले, व्याख्या केलेले, दिलेले व केलेले असल्याचे मानले जाईल;
(c) ग) (क) जुन्या संहितेखाली दिलेल्या कोणत्याही मंजुरीच्या किंवा संमतीच्या अनुरोधाने व्हावयाची कोणतीही कार्यवाही त्या संहितेखाली सुरू झालेली नसेल तर, ती मंजुरी किंवा संमती या संहितेच्या समनुरूप उपबंधांखाली दिली असल्याचे मानले जाईल आणि अशा मंजुरीच्या किंवा संमतीच्या अनुरोधाने या संहितेखाली कार्यवाही सुरू करता येईल;
३) एखाद्या अर्जासाठी किंवा अन्य कार्यवाहीसाठी जुन्या संहितेखाली निर्दिष्ट केलेली मुदत या संहितेच्या प्रारंभी किंवा तत्पूर्वी संपली असेल तर, या संहितेने त्यासाठी त्याहून आहेत, एवढ्याच कारणाने, या संहितेतील कोणत्याही गोष्टीचा अर्थ, त्यामुळे संहितेखाली असा कोणताही अर्ज करणे किंवा कार्यवाही सुरू करणे शक्य आहे असा लावला जाणारा नाही.