Bnss कलम ५०९ : कलम १८३ अगर कलम ३१६ च्या तरतुदींचे पालन न होणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५०९ :
कलम १८३ अगर कलम ३१६ च्या तरतुदींचे पालन न होणे :
१) कलम १८३ किंवा कलम ३१६ खाली नोंदलेला किंवा तसा नोंदला असल्याचे दिसणारा आरोपी व्यक्तीचा कबुलीजबाब किंवा अन्य कथन ज्या नायायलयासमोर पुराव्यात दिले गेले किंवा दाखल करून घेण्यात आले अशा कोणत्याही न्यायालयाला जर, कथन नोंदवणाऱ्या दंडाधिकाऱ्याने अशांपैकी कोणत्याही एखाद्या कलमाच्या उपबंधांचे पालन केले नसल्याचे आढळून आले तर, भारतीय साक्ष्य अधिनियम २०२३ यांच्या ९४ व्या कलमात काहीही अंतर्भूत असले तरीही, अशा अपालनासंबंधी पुरावा घेता येईल व अशा अपालनामुळे आरोपीच्या गुणधारित बजावबाबत त्याला क्षती पोचत नाही व नोंदवण्यात आलेले कथन रीतसर केले होते अशी त्याची खात्र झाली तर, त्याला असे कथन ग्राह्य धरता येईल.
२) या कलमाचे उपबंध अपिलाच्या, निर्देशनाच्या व पुनरीक्षणाच्या न्यायालयाला लागू आहेत.

Leave a Reply