Bnss कलम ५०६ : ज्यांमुळे कार्यवाही रद्दबातल होत नाही, अशा गैरनियम (अनियमित) बाबी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण ३७ :
गैरनियम (अनियमित) कार्यवाही :
कलम ५०६ :
ज्यांमुळे कार्यवाही रद्दबातल होत नाही, अशा गैरनियम (अनियमित) बाबी :
जर कोणत्याही दंडाधिकाऱ्याला पुढीलपैकी, म्हणजे-
(a) क) (अ) कलम ९७ खाली झडती-वॉरंट काढणे;
(b) ख) (ब) अपराधाचे अन्वेषण करण्यास कलम १७४ खाली पोलिसांना आदेश देणे;
(c) ग) (क) कलम १९६ खाली मरणान्वेषण करणे;
(d) घ) (ड) त्याच्या स्थानिक अधिकारितेतील ज्या व्यक्तीने अशा अधिकारितेच्या सीमांबाहेर अपराध केला असेल तिला गिरफदार करण्यासाठी कलम २०७ खाली आदेशिका काढणे;
(e) ङ) (इ) कलम २१० च्या पोटकलम (१) मधील खंड (a)(क) किंवा खंड (b)(ख) खाली अपराधाची दखल घेणे;
(f) च) (फ) कलम २१२ च्या पोटकलम (२) खाली एखादा खटला सोपवणे;
(g) छ) (ग) कलम ३४३ खाली माफी देणे;
(h) ज) (ह) कलम ४५० खाली खटला परत मागवून स्वत: त्याची संपरीक्षा करणे;
(i) झ) (आय) कलम ५०४ किंवा ५०५ खाली मालमत्तेची विक्री करणे.
यांपैकी कोणतीही एखादी गोष्ट करण्याचा अधिकार विधित: प्रदान झाला नसताना त्याने चुकीने सद्भावपूर्वक ती गोष्ट केली तर, त्याला असा अधिकार नव्हता एवढ्याच कारणावरून त्याची कार्यवाही रद्द ठरवण्यात येणार नाही.

Leave a Reply