Bnss कलम ४४९ : सत्र न्यायाधीशाने अपिले आणि खटले काढून घेणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४४९ :
सत्र न्यायाधीशाने अपिले आणि खटले काढून घेणे :
१) सत्र न्यायाधीशाला आपणांस दुय्यम असलेल्या मुख्य न्याय दंडाधिकऱ्याकडून कोणताही खटला किंवा अपील काढून घेता येईल किंवा आपण त्याच्याकडे सोपवलेला कोणताही खटला किंवा अपील परत मागवता येईल.
२) सत्र न्यायाधीशाला आपण कोणत्याही अपर सत्र न्यायाधीशाकडे सोपवलेला कोणताही खटला किंवा अपील त्या न्यायाधीशापुढे खटल्याची संपरीक्षा किंवा अपिलाची सुनावणी सुरू होण्यापूर्वी कोणत्याही वेळी परत मागवता येईल.
३) सत्र न्यायाधीश पोटकलम (१) किंवा पोटकलम (२) खाली खटला किंवा अपील काढून घेईल किंवा परत मागवील त्या बाबतीत, त्याला एकतर त्याच्या स्वत:च्या न्यायालयात खटल्याची संपरीक्षा करता येईल किंवा त्याला स्वत:ला अपिलाची सुनावणी करता येईल, अथवा, प्रकरणपरत्वे, संपरीक्षेसाठी किंवा सुनावणीसाठी या संहितेच्या उपबंधांनुसार ते काम दुसऱ्या न्यायालयाकडे सोपवता येईल.

Leave a Reply