Bnss कलम ४३९ : चौकशीचा आदेश देण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४३९ :
चौकशीचा आदेश देण्याचा अधिकार :
कलम ४३८ खाली किंवा अन्यथा कोणत्याही अभिलेखाचे परीक्षण केल्यावर उच्छ न्यायालय किंवा सत्र न्यायाधीश, कलम २२६ खाली किंवा कलम २२७ च्या पोटकलम (४) खाली काढून टाकलेल्या कोणत्याही फिर्यादीबाबात किंवा अपराधाचा आरोप असलेल्या ज्या व्यक्तीला विनादोषारोप सोडलेले असेल तिच्या प्रकरणाबाबत मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याने स्वत: किंवा त्याला दुय्यम असलेल्यांपैकी कोणत्याही दंडाधिकारी स्वत: अशी चौकशी करू शकेल किंवा कोणत्याही दुय्यम दंडाधिकाऱ्याला ती करण्याचा निदेश देऊ शकेल :
परंतु, या कलमाखाली निदेश का दिला जाऊ नये याचे कारण दाखवण्याची संधी विनादोषारोप सोडलेल्या कोणत्याही व्यक्तीला मिळाल्याशिवाय कोणतेही न्यायालय तिच्या प्रकरणाबाबत असा निदेश देणार नाही.

Leave a Reply