Bnss कलम ३९९ : निष्कारण अटक केलेल्या व्यक्तींना भरपाई :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३९९ :
निष्कारण अटक केलेल्या व्यक्तींना भरपाई :
१) जेव्हा केव्हा कोणतीही व्यक्ती पोलीस अधिकाऱ्याकरवी अन्य व्यक्तीला अटक करवील तेव्हा, जो दंडाधिकारी त्या खटल्याची सुनावणी करील त्याला जर असे दिसून आले की, अशी अटक करण्यास पुरेसे कारण नव्हते, तर अशा प्रकारे अटक करणाऱ्या व्यक्तीने अशा अटक झालेल्या व्यक्तीला त्या बाबतीत तिच्या वेळेची झालेली हानी व खर्च याबद्दल दंडाधिकाऱ्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे जास्तीत जास्त एक हजार रूपये इतकी भरपाई देण्याचा आदेश दंडाधिकारी काढू शकेल.
२) अशा प्रकरणात, जर एकाहून अधिक व्यक्तींना अटक झाली असेल तर दंडाधिकारी त्याच रीतीने, स्वत:ला योग्य वाटेल त्याप्रमाणे जास्तीत जास्त एक हजार रूपये इतकी भरपाई त्यापैकी प्रत्येकाला देववू शकेल.
३) या कलमाखाली देववलेली सर्व भरपाई, म्हणजे जणू काही द्रव्यदंड असावा त्याप्रमाणे ती वसूल करता येईल, आणि ती अशा प्रकारे वसूल करता येत नसेल तर, ज्या व्यक्तीने ती द्यावयाची तिला दंडाधिकारी निदेशित करील त्याप्रमाणे जास्तीत जास्त तीस दिवस इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाचा शिक्षादेश देण्यात येईल- मात्र तत्पुर्वी अशी रक्कम भरण्यात आली तर गोष्टी वेगळी.

Leave a Reply