भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३८८ :
उत्तर देण्यास किंवा दस्तैवज हजर करण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीला कारावासात ठेवणे किंवा हवालतीत पाठविणे :
जर कोणत्याही साक्षीदाराने त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास अथवा फौजदारी न्यायालयापुढे एखादा दस्तऐवज किंवा एखादी वस्तू हजर करण्यास जिला फर्मावण्यात आले असेल अशा एखाद्या व्यक्तीने स्वत:च्या कब्जात किंवा सत्तेखाली असलेला जो कोणताही दस्तऐवज किंवा वस्तू हजर करणे न्यायालयाने आवश्यक केले असेल ती हजर करण्यास नकार दिला आणि अशा नकाराबद्दल रास्त सबब सांगण्याची वाजवी संधी दिल्यानंतरही तिने तसे केले नाही तर, कारणे लेखी नमूद करून त्याकरता असे न्यायालय जास्तीत जास्त सात दिवसांच्या अशा कोणत्याही मुदतीकरता तिला साध्या कारावासाची शिक्षा देऊ शकेल किंवा पीठासीन दंडाधिकाऱ्याच्या किंवा न्यायाधीशाच्या सहीच्या वॉरंटाद्वारे न्यायालयाच्या एखाद्या अधिकाऱ्याच्या हवालतीत पाठवू शकेल- मात्र दरम्यान अशा व्यक्तीने आपली साक्षतपासणी केली जाण्यास व उत्तरे देण्यास अथवा तो दस्तऐवज किंवा वस्तू हजर करण्यास संमती दिली तर गोष्ट वेगळी- आणि जर तिने आपला नकाराचा हेका चालू ठेवला तर, कलम ३८४ किंवा कलम ३८५ चय उपबंधानुसार तिच्याबाबत कार्यवाही करता येईल.
