भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३६९ :
अन्वेषण किंवा संपरीक्षा प्रलंबित असेपर्यंत मनोविकल व्यक्तीस मुक्त करणे :
१) जेव्हा केव्हा एखादी व्यक्ती ही, मनोविकलता किंवा बौद्धिक दिव्यांगतेमुळे स्वत:चा बचाव करण्यास अक्षम असल्याचे कलम ३६७ किंवा कलम ३६८ अन्वये आढळून आले असेल तेव्हा दंडाधिकारी, किंवा यतास्थिती, न्यायालय हे प्रकरण जामीनपत्र किंवा अजामीपात्र अशा प्रकारचे प्रकरण असले तरी, अशा व्यक्तीस जामीनावर मुक्त करण्याचा आदेश देईल :
परंतु, आरोपी व्यक्ती, मनोविकलता किंवा बौद्धिक दिव्यांगते मुळे त्रस्त असून, त्यास आंतररूग्ण म्हणून उपचार घेण्याचा आदेश नसेल तर तिच्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी, नजीकच्या वैद्यकीय सुविधा केंद्रातून नियमितपणे बाह्यरूग्ण म्हणून मनोविकृती चिकित्साविषयक उपचार करून घेण्याची आणि त्याला स्वत:ला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला इजा करण्यापासून प्रतिबंध करण्याची हमी दिलेली असली पाहिजे.
२) जर दंडाधिकाऱ्याच्या किंवा यथास्थिती, न्यायालयाच्या मते, हे प्रकरण, ज्यामध्ये जामीन मंजूर करता येणार नाही असे प्रकरण असेल, तर किंवा यथोचित हमी देण्यात आलेली नसेल तर, तो किंवा ते ज्या ठिकाणी आरोपी व्यक्तीस नियमितपणे मनोविकृती चिकित्साविषयक उपचार करता येऊ शकेल अशा ठिकाणी आरोपी व्यक्तीस ठेवण्याचा आदेश देईल, आणि केलेल्या कारवाईचा अहवाल राज्यशासनास सादर करील :
परंतु, मानसिक आरोग्य अधिनियम, २०१७ (२०१७ चा १०) अन्वये राज्यशासनाने जे केले असतील अशा नियमांनुसार असेल त्याखेरीज आरोपीला, मानसिक स्वास्थ्य स्थापनेत स्थानबध्द करण्याचा आदेश देण्यात येणार नाही.
३) जेव्हा केव्हा एखादी व्यक्ती ही, मनोविकलता किंवा बौद्धिक दिव्यांगतेमुळे कलम ३६७ किंवा ३६८ अनुसार स्वत:चा बचाव करण्यास अक्षम असल्याचे आढळून आले असेल तेव्हा दंडाधिकारी, किंवा यथास्थिती, न्यायालय, केलेल्या कृत्याचे स्वरूप आणि मनोविकलता किंवा बौद्धिक दिव्यांगतेची व्याप्ती विचारात घेऊन, आरोपी व्यक्तीस मुक्त करता येऊ शकत असेल तर याबाबत पुढील निर्णय घेईल :
परंतु,
(a) क) (अ) जर वैद्यकीय मताच्या आधारे किंवा विशेषज्ञाच्या मताच्या आधारे दंडाधिाकऱ्याने किंवा यथास्थिती, न्यायालयाचे कलम ३६७ किंवा कलम ३६८ च्या तरतुदीनुसार आरोपी व्यक्तीस मुक्त करण्याच्या आदेशाबाबत निर्णय घेतला असेल तर, अशी मुक्तता आरोपी स्वत:ला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला जखमी करू नये यासाठी प्रतिबंध करता येईल. अशी वाजवी प्रतिभूती दिली असेल तरच, आरोपीला अशाप्रकारे मुक्त करण्यात येईल;
(b) ख) (ब) जर आरोपी व्यक्तीस मुक्त करता येऊ शकणार नाही असे दंडाधिाकाऱ्याचे, किंवा यथास्थिती, न्यायालयाचे असे मत असेल तर, ज्यामध्ये आरोपी व्यक्तीची काळजी घेण्यात येईल आणि समुचित शिक्षण व प्रशिक्षण देण्यात येईल अशा मनोविकल किंवा बौद्धिक द्विव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या निवासी सुविधा आरोपी व्यक्तीला देण्यात येतील.