भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३५७ :
आरोपीला कार्यवाही समजत नसेल तेव्हाची प्रक्रिया :
आरोपी जरी मनोविकल नसला तरी त्याला कार्यवाही समजावून देणे शक्य नसेल तर, न्यायालय चौकशी किंवा संपरीक्षा पुढे चालवू शकेल व उच्च न्यायालयाहून अन्य न्यायालयाच्या बाबतीत, जर अशा कार्यवाहीची परिणती दोषसिध्दीत झाली तर ती कार्यवाही उच्च न्यायालयाकडे त्या खटल्याच्या परिस्थितीच्या अहवालासह पाठवली जाईल व उच्च न्यायालय त्यावर स्वत:ला योग्य वाटेल तो आदेश देईल.