Bnss कलम ३५२ : तोंडी युक्तिवाद आणि युक्तिवादाचे टिपण :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३५२ :
तोंडी युक्तिवाद आणि युक्तिवादाचे टिपण :
१) कार्यवाहीतील कोणत्याही पक्षकाराला आपला साक्षीपुरावा संपल्यावर शक्य होईल तितक्या लवकर तोंडी संक्षिप्त युक्तिवाद करता येईल व काही युक्तिवाद तोंडी मांडला असल्यास तो संपवण्यापूर्वी न्यायालयाकडे आपल्या बाजूला पुष्टिकारक असे युक्तिवाद संक्षिप्तात व वेगवेगळ्या शीर्षकाखाली देणारे टिप्पण सादर करता येईल व असे प्रत्येक टिप्पण अभिलेखाचा भाग होईल.
२) अशा प्रत्येक टिप्पणाची एक प्रत त्याच वेळी विरूध्द पक्षकाराला पुरवण्यात येईल.
३) लेखी युक्तिवाद दाखल करण्यासाठी कार्यवाही तहकूब करण्याला मान्यता दिली जाणार नाही- मात्र काही कारणांस्तव अशा तहकुबीला मान्यता देणे न्यायालयाला जरूरीचे वाटल्यास त्याला ती कारणे नमूद करावी लागतील.
४) तोंडी युक्तिवाद संक्षिप्त किंवा संबध्द नाहीत असे न्यायालयाचे मत असेल तर, ते त्यावर नियंत्रण घालू शकेल.

Leave a Reply