Bnss कलम ३४७ : स्थळाचे निरिक्षण :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३४७ :
स्थळाचे निरिक्षण :
१) चौकशी, संपरीक्षा किंवा अन्य कार्यवाही कोणत्याही टप्प्याला असताना पक्षकारांना रीतसर नोटीस देऊन कोणताही न्यायाधीश किंवा दंडाधिकारी अपराध ज्या स्थळी घडल्याचे अभिकथन करण्यात आले असेल अशा कोणत्याही स्थळाला अथवा अशा चौकशीत किंवा संपरीक्षेत दिलेल्या साक्षीपुराव्याचे यथोचित मूल्यमापन करण्यासाठी ज्याची पाहणी करणे त्याच्या मते जरूरीचे असेल अशा कोणत्याही स्थळाला भेट देऊन पाहणी करू शकेल आणि अनावश्यक विलंब न लावता तो अशा पाहणीत नजरेस आलेल्या कोणत्याही संबध्द तथ्यांचे टिप्पण नमूद करील.
२) असे टिप्पण खटल्याच्या अभिलेखाचा भाग होईल आणि अभियोक्त्याने, फिर्याददाराने किंवा आरोपीने किंवा खटल्यातील अन्य कोणत्याही पक्षकाराने तशी इच्छा दर्शवली तर, त्याला त्या टिप्पणीची प्रत विनामूल्य पुरविण्यात येईल.

Leave a Reply