Bnss कलम ३३२ : प्रतिज्ञापत्राद्वारे (शपथपत्र) औपचारिक स्वरूपाचा साक्षीपुरावा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३३२ :
प्रतिज्ञापत्राद्वारे (शपथपत्र) औपचारिक स्वरूपाचा साक्षीपुरावा :
१) जिची साक्ष औपचारिक स्वरूपाची आहे, अशा कोणत्याही व्यक्तीला प्रतिज्ञालेखाद्वारे साक्ष देता येईल, आणि सर्व रास्त अपवाद सोडून, या संहितेखालील कोणत्याही चौकशीत संपरीक्षेत किंवा अन्या कार्यवाहीत ती पुराव्यादाखल वाचता येईल.
२) न्यायालयाला योग्य वाटले तर अशा कोणत्याही व्यक्तीला समक्ष पाठवून प्रतिज्ञालेखात अंतर्भूत असलेल्या तथ्यांबाबत न्यायालय तिची साक्षतपासणी करू शकेल आणि फिर्यादीपक्षचा किंवा आरोपीचा अर्ज आल्यास तसे करावे लागेल.

Leave a Reply