Bnss कलम ३२६ : वैद्यकीय साक्षीदाराची जबानी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३२६ :
वैद्यकीय साक्षीदाराची जबानी :
१) जिल्हा शल्यचिकित्सकाची किंवा अन्य वैद्यकीय साक्षीदाराची दंडाधिकाऱ्याने आरोपीच्या समक्ष घेतलेली व साक्षांकित केलेली किंवा या प्रकरणाखालील आयोगपत्रावरून घेतलेली जबानी ही, जबानीदाराला जरी साक्षीदार म्हणून बोलावलेले नसले तरी, या संहिते-खालील कोणत्याही चौकशीत, संपरीक्षेत किंवा अन्य कार्यवाहीत पुरावा म्हणून देता येईल.
२) न्यायालयाला योग्य वाटले तर अशा कोणत्याही जबानीदाराला समन्स पाठवून त्याच्या जबानीच्या विषय वस्तूबाबत न्यायालय त्याची साक्षतपासणी करू शकेल आणि फिर्यादीपक्षाचा किंवा आरोपीचा अर्ज आल्यास त्याला तसे करावे लागेल.

Leave a Reply