Bnss कलम ३०६ : कारागृहातील साक्षीदाराच्या साक्ष तपासणीसाठी आयोगपत्र काढण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३०६ :
कारागृहातील साक्षीदाराच्या साक्ष तपासणीसाठी आयोगपत्र काढण्याचा अधिकार :
या प्रकरणाचे उपबंध, कारागृहात बंदिवान किंवा स्थानबद्ध केलेल्या कोणत्याही व्यक्तीची साक्षीदार म्हणून साक्षीतपासणी करण्यासाठी कलम ३१९ खाली आयोगपत्र काढण्याच्या न्यायालयाच्या अधिकाराला बाधक असणार नाहीत; आणि २५ व्या प्रकरणाचा भाग (ख) चे उपबंध आयोगापत्रावरून अन्य कोणत्याही व्यक्तीच्या होणाऱ्या साक्षतपासणीच्या संबंधात जसे लागू आहेत तसे ते कारागृहातील अशा कोणत्याही व्यक्तीची आयोगापत्रावरून साक्षतपासणी करण्याच्या संबंधात लागू असतील.

Leave a Reply