भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३०५ :
कैद्याला न्यायालयापुढे बंदोबस्तात आणणे :
कलम ३०४ च्या उपबंधांच्या अधीनतेने, कारागृहाचा अंमलदार अधिकारी कलम ३०२ च्या पोटकलम (१) खाली दिलेल्या व त्या कलमाच्या पोटकलम (२) खाली जरूर तेथे प्रतिस्वाक्षरित केलेला आदेश हाती पडताच, आदेश नामनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तीला ज्या न्यायलयात तिची समक्ष हजेरी आवश्यक असेल तेथे आदेशात नमूद केलेल्या वेळी उपस्थित राहता येईल अशा बेताने तिला नेण्याची व्यवस्था करील, आणि तिची साक्षतपासणी होईपर्यंत किंवा ज्या कारागृहात तिला बंदिवान किंवा स्थानबध्द केले होते तेथे तिला परत नेण्यासाठी न्यायालयाकडून प्राधिकार मिळेपर्यंत न्यायालयात किंवा त्याच्या जवळपास तिला बंदोबस्तात ठेवण्याची व्यवस्था करील.