भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २८४ :
व्दितीय वर्ग दंडाधिकाऱ्यांनी करावयाची संक्षिप्त संपरीक्षा :
द्वितीय वर्ग दंडाधिकाऱ्याचे अधिकार ज्याच्या ठायी विनिहित झाले असतील अशा कोणत्याही दंडाधिकाऱ्याला जो कोणताही अपराध केवळ द्रव्यदंडाच्या अथवा द्रव्यदंडासहित किंवा त्याविना जास्तीत जास्त सहा महिने इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल त्याची आणि अशा कोणत्याही अपराधाचे कोणत्याही प्रकारे अपप्रेरण किंवा तो अपराध करण्याचा प्रयत्न या प्रकरणांची संक्षेपत: संपरीक्षा करण्याचा अधिकार उच्च न्यायालय प्रदान करू शकेल.