Bnss कलम २३८ : चुकांचा परिणाम :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २३८ :
चुकांचा परिणाम :
अपराध किंवा दोषारोपात जो तपशील नमूद करणे आवश्यक आहे तो तपशील नमूद करताना झालेल्या कोणत्याही चुकीमुळे आणि अपराधाच्या किंवा त्या तपशिलाच्या अनुल्लेखामुळे आरोपींची खरोखरी दिशाभूल झाली असून, त्यामूळे न्याय होऊ शकला नाही असे घडले नसेल तर, खटल्याच्या कोणत्याही टप्प्याला अशी कोणतीही चूक किंवा असा कोणताही अनुल्लेख महत्वाचा समजला जाणार नाही.
उदाहरणे :
(a) क) भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १८० खाली (क) वर एखादे नकली नाणे कब्जात आले त्यावेळी ते नकली असल्याचचे ज्ञात असताना ते कब्जात बाळगल्याचा दोषारोप ठेवण्यात आला असून, दोषारोपात कपटपूर्वक हा शब्द गाळला गेला आहे. या अनुल्लेखामुळे (क) ची खरोखरी दिशाभूल झझाली असे दिसून आल्याशिवाय ती चूक महत्वाची समजली जाणार नाही.
(b) ख) (क) वर (ख) ला ठकवल्याचा दोषारोप आहे, आणि कोणत्या रीतीने त्याने (ख) ला ठकवले ते दोषारोपात मांडलेले नाही किंवा चुकीच्या स्वरुपात मांडले आहे. (क) स्वत:चा बचाव देतो साक्षीदार बोलावतो आणि त्या संव्यवहाराविषयी स्वत:चा खुलासा देतो. यावरुन न्यायालयाला असे अनुमान काढता येईल की, कोणत्या रीतीने ठकवले त्याचा अनुल्लेख महत्वाचा नाही.
(c) ग) (क) वर (ख) ला ठकवल्याचा दोषारोप आहे आणि कोणत्या रीतीने त्याने (ख) ला ठकवले ते दोषारोपात मांडलेले नाही. (क) आणि (ख) यांच्यामध्ये अनेक संव्यवहार झाले होते आणि दोषारोप त्यांपैकी कोणत्या संवव्यवहारास अनुलक्षून होता ते करण्यास (क) ला काहीच मार्ग नव्हता. व त्याने बचाव दिला नाही. अशा तथ्यांवरुन न्यायालयाला असे अनुमान काढता येईल की, कोणत्या रीतीने ठकवले त्याचा अनुल्लेख ही या प्रकरणात महत्वाची चूक होती.
(d) घ) (क) वर २१ जानेवारी २०२३ रोजी खुदाबक्ष याचा खून केल्याचा दोषारोप आहे वस्तुत: खून झालेल्या व्यक्तीचे नाव हैदरबक्ष असे होते, आणि २० जानेवारी २०२३ ही खुनाची तारीख होती. हा एक खून वगळता, (क) वर कधीही कोणत्या खुनाचा दोषारोप नव्हता आणि दंडाधिकाऱ्यासमोर ज्या चौकशीची सुनावणी झाली ती फक्त हैरबक्षच्याच खुनाला अनुलक्षून होती. या तथ्यावरुन न्यायालयाला असे अनुमान काढता येईल की, (क) ची दिशाभूल झालेली नव्हती, आणि दोषारोपातील चूक गौण होती.
(e) ङ) (क) वर हैदरबक्षचा २० जानेवारी २०२३ रोजी आणि (ज्याने त्या खुनाबद्दल त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला त्या) खुदाबक्षचा २१ जानेवारी २०२३ रोजी खून केल्याचा दोषारोप होता. हैदरबक्षच्या खुनाचा दोषारोप त्याच्यावर करण्यात आला तेव्हा, खुदाबक्षच्या खुनाबद्दल त्याची संपरीक्षा करण्यात आली. त्याच्या बचावासाठी हजर असलेले साक्षीदार हे हैदरबक्षच्या खटल्यातील साक्षीदार होते. न्यायालयाला यावरुन असे अनुमान काढता येईल की, (क) ची दिशाभूल झाली, आणि ती चूक महत्वाची होती.

Leave a Reply