Bnss कलम २२८ : आरोपीची कोर्टापुढील हजेरी माफ करणे:

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २२८ :
आरोपीची कोर्टापुढील हजेरी माफ करणे:
१) जेव्हा केव्हा दंडाधिकारी समन्स काढील तेव्हा, त्याला तसे करण्यास कारण दिसले तर, तो आरोपीची जातीनिशी उपस्थिती माफकरून त्याला आपल्या वकिलामार्फ त उपस्थित राहण्याची परवानगी देऊ शकेल.
२) पण खटल्याची चौकशी किंवा संपरीक्षा करणारा दंडाधिकारी स्वविवेकानुसार, कार्यवाही कोणत्याही टप्प्यात असताना, आरोपीला जातीनिशी उपस्थित राहण्याबाबत निदेश देऊ शकेल आणि जरूर तर, त्याला याप्रमाणे उपस्थित राहण्यास यात यापूर्वी उपबंधित केलेल्या रीतीने भाग पाडू शकेल.

Leave a Reply