भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २०९ :
भारताबाहेर घडलेल्या अपराधांचा पुरावा दाखल करून घेणे :
जो कोणताही अपराध भारताबाहेरील एखाद्या क्षेत्रात केला असल्याचे अभिकथन करण्यात आले असेल त्याची कलम २०८ च्या उपबंधांखाली चौकशी किंवा संपरीक्षा चालू असेल तेव्हा, केंद्र शासनाला योग्य वाटल्यास ते असे निदेशित करू शकेल की, एक तर वास्तविक प्ररुपात किंवा इलेक्ट्रॉनिक प्ररुपात त्या क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राकरता नेमलेल्या न्यायिक अधिकाऱ्यासमोर अथवा त्या क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राकरता नेमलेल्या भारताच्या राजदौतिक किंवा वाणिज्यदौतिक प्रतिनिधीसमोर दिलेल्या जबान्यांच्या प्रती किंवा हजर केलेल्या निशाण्या, अशी चौकशी किंवा संपरीक्षा करणाऱ्या न्यायालयाने अशा जबान्या किंवा निशाण्या ज्यांच्याशी संबंधित असतील त्या बाबींसंबंधीचा पुरावा घेण्यासाठी असे न्यायालय आयोगपत्र काढू शकले असते. अशा कोणत्याही बाबतीत, अशा न्यायालयाने पुराव्यात दाखल करून घ्याव्यात.