Bnss कलम १९८ : चौकशीचे आणि संपरीक्षेचे स्थळ :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १९८ :
चौकशीचे आणि संपरीक्षेचे स्थळ :
(a) क) (अ) जेव्हा अनेक स्थानिक क्षेत्रांपैकी कोणत्या क्षेत्रात अपराध घडला हे अनिश्चित असेल तेव्हा, किंवा
(b) ख) (ब) जेव्हा अपराध अंशत: एका स्थानिक क्षेत्रात व अंशत: अन्य स्थानिक क्षेत्रांत घडला असेल तेव्हा, किंवा
(c) ग) (क) जेव्हा अपराध सतत चालू राहणारा असा असेल व एकाहून अधिक स्थानिक क्षेत्रांत तो घडत राहिला असेल तेव्हा, किंवा
(d) घ) (ड) जेव्हा तो निरनिराळ्या स्थानिक क्षेत्रांत केलेल्या अनेक कृती मिळून झाला असेल तेव्हा,
अशांपैकी कोणत्याही स्थानिक क्षेत्रावर अधिकारिता असलेल्या न्यायालयाला त्याची चौकशी किंवा संपरीक्षा करता येईल.

Leave a Reply