भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १९५ :
व्यक्तींना समन्स पाठविण्याचा अधिकार :
१) कलम १९४ खाली कार्यवाही करणारा पोलीस अधिकारी लेखी आदेशाद्वारे अशा पूर्वोक्त दोन किंवा अधिक व्यक्तींना उक्त अन्वेषणाच्या प्रयोजनार्थ व जी प्रकरणाच्या तथ्यांशी परिचित असल्याचे दिसत असेल अशा अन्य कोणत्याही व्यक्तीला समन्स पाठवू शकेल व याप्रमाणे समन्स पाठवण्यात आलेली प्रत्येक व्यक्ती समक्ष हजर होण्यास व ज्यांच्या उत्तरामुळे तिला फौजदारीपात्र आरोपाला किंवा शिक्षेला किंवा समपहराणाला पात्र व्हावे लागण्याची शक्यता आहे अशा प्रश्नांहून अन्य सर्व प्रश्नांची खरेपणाने उत्तरे देण्यास बांधलेली असेल :
परंतु, कोणत्याही पंधरा वर्षं वयाखालील किंवा साठ वर्षांवरील वयाच्या पुरूषाला किंवा एखाद्या स्त्रीला किंवा मानसिकदृष्टया किंवा शारीरिकदृष्टया विकलांग व्यक्तीला किंवा गंभीर आजाराने ग्रस्त अशा व्यक्तीला, असा पुरूष किंवा स्त्री ज्या स्थळी राहात असेल त्याहून अन्य कोणत्याही स्थळी हजर राहण्यास सांगितले जाणार नाही :
परंतु आणखी असे की जर अशी व्यक्ती पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित राहून उत्तर देण्यास सहमत असेल तर त्या व्यक्ति तसे करण्यास अनुज्ञात केल जाईल.
२) ज्याला कलम १९० लागू आहे असा दखलपात्र अपराध तथ्यांवरून उघडकीस आला नाही, तर पोलीस अधिकाऱ्याकडून अशा व्यक्तींना दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात समक्ष हजर होण्यास फर्मावण्यात येणार नाही.