Bnss कलम १७९ : साक्षीदारांना समक्ष हजर राहण्यास फर्माविण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १७९ :
साक्षीदारांना समक्ष हजर राहण्यास फर्माविण्याचा अधिकार :
१) या प्रकरणाखाली अन्वेषण करणारा कोणताही पोलीस अधिकारी, त्याच्या स्वत:च्या ठाण्याच्या किंवा लगतच्या ठाण्याच्या हद्दींमध्ये असलेली जी कोणतीही व्यक्ती ही, प्रकरणांच्या तथ्यांशी व परिस्थितीशी परिचित आहे असे देण्यात आलेल्या वर्दीवरून किंवा अन्यथा दिसत असेल अशा कोणत्याही व्यक्तीला समक्ष राहण्यास फर्मावू शकेल; आणि याप्रमाणे फर्मावण्यात आाल्यानुसार अशा व्यक्तीला हजर राहावे लागेल :
परंतु, कोणत्याही पंधरा वर्षं वयाखालील किंवा साठ वर्षांवरील वयाच्या पुरूषाला किंवा एखाद्या स्त्रीला किंवा मानसिकदृष्टया किंवा शारीरिकदृष्टया विकलांग व्यक्तीला किंवा गंभीर आजाराने ग्रस्त अशा व्यक्तीला, असा पुरूष किंवा स्त्री ज्या स्थळी राहात असेल त्याहून अन्य कोणत्याही स्थळी हजर राहण्यास सांगितले जाणार नाही :
परंतु आणखी असे की, जर अशी व्यक्ती पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सहमत असेल, तर तसे करण्याची परवानगी दिली जाऊ शकेल.
२) पोटकलम (१)अन्वये स्वत:च्या निवासस्थानाव्यतिरिक्त अन्य स्थळी हजर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्याने तिचा वाजवी खर्च द्यावा यासाठी राज्य शासनाला यासंबंधात नियम करून त्या व्दारे उपबंध करता येईल.

Leave a Reply