भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १७८ :
अन्वेषण किंवा प्रारंभिक चौकशी करण्याचा अधिकार :
असा दंडाधिकारी असा अहवाल मिळाल्यावर या संहितेत उपबंधित केलेल्या रीतीने कलम १७६ खाली त्या प्रकरणाचे अन्वेषण करण्याचा निदेश देऊ शेकल, अथवा त्यास योग्य वाटले तर, लगेच त्याची प्रारंभिक चौकशी करण्याची किंवा अन्यथा ते निकालात काढण्याची कार्यवाही करू शकेल किंवा ती कार्यवाही करण्यासाठी आपल्याला दुय्यम असलेल्या कोणत्याही दंडाधिकाऱ्याला प्रतिनियुक्त करू शकेल.