Bnss कलम १६२ : सार्वजनिक उपद्रव पुन्हा करणे-चालू ठेवणे यास मनाई :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १६२ :
सार्वजनिक उपद्रव पुन्हा करणे-चालू ठेवणे यास मनाई :
जिल्हा दंडाधिकारी किंवा उप-विभागीय दंडाधिकारी अथवा राज्य शासनाने किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्याने या संबंधात अधिकार प्रदान केलेला अन्य कोणताही कार्यकारी दंडाधिकारी किंवा पोलिस उपायुक्त कोणत्याही व्यक्तीला भारतीय न्याय संहिता २०२३ यात अगर अन्य कोणत्याही विशेष किंवा स्थानिक कायद्यात जशी व्याख्या केली आहे तसा सार्वजनिक उपद्रव पुन्हा न करण्याचा किंवा तो चालू न ठेवण्याचा आदेश देऊ शकेल.

Leave a Reply