भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ११९ :
सरकारजमा मिळकतीची नोटीस :
१) कलम ११६ खाली केलेल्या चौकशी तपास पाहणी वगैरेवरून कोर्टाला असे वाटते की सर्व मिळकत अगर काही मिळकत अपराध करून मिळवलेली आहे, तर त्या इसमावर (परिणाम झालेली व्यक्ती म्हणून यापूढे संबोधण्यात येईल) नोटीस बजाविण्यात येईल की त्याने ३० दिवसांचे आत उत्पन्नाचे साधन, कमाई वगैरे कळवावी, की ज्यामधून त्याने वरील मिळकत खरेदी केली आहे. सोबत लागू असलेला सर्व पुरावा ज्याचेवर तो अवलंबून आहे तो द्यावा. आणि कारणे दाखवावी की मिळकत अपराधामधून मिळविलेली नाही आणि केंद्र सरकारला जमा करू नये.
२) जर पोटकलम (१)मधील नोटीसीमध्ये दर्शविलेले असेल की ती मिळकत आरोपीतर्फे दुसरा इसम धारण करत आहे, तर त्या इसमाला पण नोटीस प्रत द्यावी.