Bnss कलम ९४ : दस्तैवज किंवा अन्य वस्तू हजर करण्यासाठी समन्स :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण ७ :
वस्तू हजर करण्याची सक्ती करणारी आदेशिका :
(A)क) (अ) – हजर करण्यासाठी समन्स :
कलम ९४ :
दस्तैवज किंवा अन्य वस्तू हजर करण्यासाठी समन्स :
१) जेव्हा केव्हा कोणत्याही न्यायालयाला किंवा पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला, या संहितेखाली अशा न्यायालयाने किंवा अधिकाऱ्याने किंवा त्या न्यायालयाच्या अगर अधिकाऱ्याला, समोर करावयाचे कोणतेही अन्वेषण, चौकशी, संपरीक्षा किंवा अन्य कार्यवाही यांच्या प्रयोजनार्थ कोणताही दस्तऐवज किंवा अन्य वस्तू हजर केली जाणे जरूरीचे किंवा इष्ट वाटेल तेव्हा, ज्या व्यक्तीच्या कब्जात किंवा नियंत्रणाखाली असा दस्तऐवज,इलेक्ट्रानिक संप्रेषण, ज्यात डिजिटल पुरावे असण्याची शक्यता आहे अशा संप्रेषण उपकरण किंवा वस्तु आहे असा आपला समज असेल तिला असे न्यायालय समन्स काढून किंवा असा अधिकारी आदेश काढून तिला समन्समध्ये किंवा आदेशात नमूद केलेल्या व स्थळी ते हजर करण्यास किंवा उपस्थित राहून ते हजर करण्यास फर्मावू शकेल.
२) या कलमाखाली ज्या व्यक्तीला दस्तऐवज किंवा अन्य वस्तू केवळ हजर करण्यास फर्मावण्यात आले असेल अशा कोणत्याही व्यक्तीने ते हजर करण्यासाठी जातीने उपस्थित राहण्याऐवजी असा दस्तऐवज किंवा वस्तू हजर करवली तर, तिने या फर्मानाचे अनुपालन केले असल्याचे मानले जाईल.
३) या कलमातील कोणतीही गोष्ट –
(a) क) (अ) भारतीय साक्ष्य अधिनियम २०२३ याची कलमे १२९ व १३० किंवा बँकव्यवसायीची पुस्तके पुरावा अधिनियम, १८९१ (१८९१ चा १३) यावर परिणाम करते ; किंवा
(b) ख) (ब) डाक प्राधिकरणाच्या ताब्यातील पत्र, पोस्ट – कार्ड किंवा अन्य दस्तऐवज किंवा कोणतेही पार्सल किंवा वस्तू यांना लागू आहे; असे मानले जाणार नाही.

Leave a Reply