Bnss कलम ८० : अधिकारक्षेत्राबाहेर वॉरंटाची बजावणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ८० :
अधिकारक्षेत्राबाहेर वॉरंटाची बजावणी :
१) जेव्हा एखाद्या वॉरंटाची अंमलबजावणी, ते काढणाऱ्या न्यायालयाच्या अधिकारिताक्षेत्राबाहेर करावयाची असेल तेव्हा, असे न्यायालय आपल्या अधिकारितेतील पोलीस अधिकाऱ्याला ते निदेशून लिहिण्याऐवजी ज्याच्या अधिकारितेच्या स्थानिक मर्यादांच्या आत त्याची अंमलबजाणी करावयाची असेल अशा कोणत्याही कार्यकारी दंडाधिकाऱ्याकडे किंवा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे किंवा पोलीस आयुक्ताकडे डाकेने किंवा अन्य प्रकारे ते पाठवील; व तो कार्यकारी दंडाधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक किंवा आयुक्त त्यावर आपले नाव पृष्ठांकित करील व व्यवहार्य असल्यास, यात यापूर्वी उपबंधित केलेल्या रीतीने त्याची अंमलबजावणी करवील.
२) पोटकलम(१) खाली वॉरंटं काढणारे न्यायालय अटक करावयाच्या व्यक्तीला जामीन मंजूर करावा की करू नये याचा निर्णय करणे कलम ८३ खाली कार्य करणाऱ्या न्यायालयाला शक्य होण्यासाठी पुरेसा होईल इतका त्या व्यक्तीच्या विरुध्द असलेल्या माहितीचा सारांश व त्यासोबत त्यासाठी पुरेसे होतील असे कोणतेही दस्तऐवज असल्यास ते वॉरंटाबरोबर पाठवील.

Leave a Reply