भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ७५ :
विशिष्ट परिस्थितीत वॉरंट कोणालाही देता येते :
१) मुख्य न्याय दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी कोणत्याही पळून गेलेल्या सिध्ददोषीच्या, उद्घोषित अपराध्याच्या किंवा बिनजामिनी अपराधाचा आरोप असून जी व्यक्ती अटक चुकवीत असेल त्या व्यक्तीच्या अटकेसाठी स्थानिक अधिकारितेतील कोणत्याही व्यक्तीला उद्देशून वॉरंट लिहू शकेल.
२) अशा व्यक्तीला वॉरंटाची लेखी पोच द्यावी लागेल व ज्याच्या अटकेसाठी ते वॉरंट काढलेले होते तो इसम आपल्या अखत्याराखालील कोणत्याही जमिनीत किंवा अन्य मालमत्तेच्या ठिकाणी असेल किंवा तेथे त्याने प्रवेश केला असेल तर, वॉरंटाची तिला अंमलबजावणी करावी लागेल.
३) जिच्या विरुध्द वॉरंट काढले असेल त्या व्यक्तीला अटक केली जाईल तेव्हा, ती वॉरंटासह निकटतम पोलीस अधिकाऱ्याच्या स्वाधीन केली जाईल व कलम ७३ खाली जामीन घेण्यात आला नाही तर तो अधिकारी त्या प्रकरणात अधिकारिता असलेल्या दंडाधिकाऱ्यापुढे तिला नेण्याची तजवीज करील.