भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ७३ :
जामिनाचे वॉरंट (जामिन घेण्यासाठी निदेश देण्याची शक्ति) :
१) कोणत्याही व्यक्तीच्या अटकेचे वॉरंट काढणारे कोणतेही न्यायालय स्वविवेकानुसार त्या वॉरंटावर पृष्ठांकन करून असा निदेश देऊ शकेल की, जर विनिर्दिष्ट वेळी व त्यानंतर न्यायालय अन्यथा निदेश देईपर्यंत न्यायालयापुढे उपस्थित होण्याबाबत पुरेशा जामीनदारांसह अशा व्यक्तीने बंधपत्र निष्पादित केले तर वॉरंट ज्याला निदेशून लिहिलेले असेल त्या अधिकाऱ्याने असा जामीन घ्यावा व अशा व्यक्तीची हवालतीतून सुटका करावी.
२) पृष्ठांकनात –
(a) क) (अ) जामीनदारांची संख्या ;
(b) ख) (ब) जितक्या रकमेकरता ते जामीनदार व जिच्या अटकेचे वॉरंट काढलेले असेल ती व्यक्ती यांच्यापैकी प्रत्येकजण बांधलेला असेल ती रक्कम;
(c) ग) (क) ज्या वेळी त्या व्यक्तीने न्यायालयापुढे उपस्थित व्हावयाचे असेल ती वेळ, हे नमूद केले जाईल.
३) जेव्हाकेव्हा या कलमाखाली जामीन घेतला जाईल तेव्हा, वॉरंट ज्याला निदेशून लिहिलेले असेल तो अधिकारी ते बंधपत्र न्यायालयाकडे पाठवील.