Bnss कलम ४१ : दंडाधिकाऱ्याकडून अटक :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४१ :
दंडाधिकाऱ्याकडून अटक :
१) जेव्हा दंडाधिकाऱ्याच्या समक्ष- मग तो कार्यकारी असो वा न्यायिक असा त्याचा स्थानिक अधिकारितेत अपराध करण्यात येईल तेव्हा, अपराध्याला तो स्वत: अटक करु शकेल किंवा त्याल अटक करण्यास कोणत्याही व्यक्तीला आदेश देऊ शकेल आणि तद्नंतर, जामिनाबाबत यात अंतर्भूत असलेल्या उपबंधाच्या अधीनतेने, अपराध्याला हवालतीत पाठवू शकेल.
२) कोणताही दंडाधिकारी- मग तो कार्यकारी असो वा न्यायिक असो- जिच्या अटकेसाठी वॉरंट काढण्यास तो त्या वेळी व त्या परिस्थितीत सक्षम असेल अशा कोणत्याही व्यक्तीला आपल्या स्थानिक अधिकारितेत आपल्या समक्ष कोणत्याही वेळी अटक करु शकेल किंवा अटक करण्याचा निदेश देऊ शकेल.

Leave a Reply