भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३३ :
विवक्षित अपराधांची जनतेने वर्दी (माहिती) देणे :
१) भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या पुढीलपैकी कोणत्याही कलमाखाली शिक्षापात्र असलेला अपराध करण्यात आल्याचे किंवा असा अपराध करण्याचा अन्य कोणत्याही व्यक्तीचा उद्देश असल्याचे असलेल्या प्रत्येक व्यक्तीनो कोणत्याही वाजवी सबबीच्या अभावी -ती सबब सिध्द करण्याची जबाबदारी याप्रमाणे माहिती असलेल्या व्यक्तीवर राहील- तत्काळ सर्वांत जवळच्या दंडाधिकाऱ्याला किंवा पोलीस अधिकाऱ्याला अशा कृतीची किंवा उद्देशाची वर्दी दिली पाहिजे – ती कलमे अशी :-
एक) कलम १०३ ते १०५ (दोन्ही धरुन);
दोन) कलम १११ ते कलम ११३ (दोन्ही धरुन);
तीन) कलम १४० ते कलम १४४ (दोन्ही धरुन);
चार) कलम १४७ ते कलम १५४ (दोन्ही धरुन) आणि कलम १५८;
पाच) कलम १७८ ते कलम १८२ (दोन्ही धरुन);
सहा) कलम १८९ आणि कलम १९१;
सात) कलम २७४ ते कलम २८० (दोन्ही धरुन);
आठ) कलम ३०७;
नऊ) कलम ३०९ ते कलम ३१२ (दोन्ही धरुन);
दहा) कलम ३१६ चे पोटकलम (५);
अकरा) कलम ३२६ ते कलम ३२८ (दोन्ही धरुन); आणि
बारा) कलम ३३१ आणि कलम ३३२.
२) या कलमाच्या प्रयोजनांसाठी अपराध या शब्दात भारताबाहेर कोणत्याही स्थळी केलेली जी कृती भारतात केली तर अपराध ठरेल अशा कोणत्याही कृतीचा समावेश आहे.