Ipc कलम ४८३ : दुसऱ्याने वापरले असेल असे स्वामित्व (संपत्ती) चिन्ह नकली तयार करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४८३ :
दुसऱ्याने वापरले असेल असे स्वामित्व (संपत्ती) चिन्ह नकली तयार करणे :
(See section 347(1) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दुसऱ्याने वापरले असेल तसे स्वामित्व-चिन्ह नुकसान किंवा क्षती पोचवण्याच्या उद्देशाने नकली तयार करणे.
शिक्षा :२ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : जिच्या व्यापार-चिन्हाचे किंवा स्वामित्व-चिन्हाचे नकलीकरण झाले ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जो कोणी अन्य कोणत्याही व्यक्तीने वापरले असेल तसे कोणतेही १.(***) स्वामित्व चिन्ह नकली तयार करील, त्याला दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
——-
१. १९५८ चा अधिनियम ४३ – कलम १३५ व अनुसूची यांद्वारे व्यापार-चिन्ह किंवा हे शब्द वगळण्यात आले.

Leave a Reply