भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४६० :
रात्रीच्या वेळी चोरटे गृह-अतिक्रमण किंवा घरफोडी (गृह-भेदन) करण्यात संयुक्तपणे निबद्ध असलेल्यांपैकी एका व्यक्तीने मृत्यू घडवून आणल्यास किंवा जबर दुखापत केल्यास त्या बाबतीत सर्व व्यक्ती शिक्षापात्र :
(See section 331(8) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : रात्रीच्या वेळी घरफोडी, इत्यादी करण्यात संयुक्तपणे निबद्ध असलेल्या निरनिराळ्या व्यक्तींपैकी एकाने मृत्यू घडवून आणणे किंवा जबर दुखापत करणे.
शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
रात्रीच्या वेळी चोरटे गृह-अतिक्रमण किंवा रात्रीच्या वेळी घरफोडी करताना अशा अपराधाबद्दल दोषी असलेल्या कोणत्याही व्यक्तीने इच्छापूर्वक एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणला, किवा त्याला जबर दुखापत केली, अथवा तसे करण्याचा प्रयत्न केला तर, रात्रीच्या वेळी असे चोरटे गृह-अतिक्रमण किंवा रात्रीच्या वेळी घरफोडी करण्यात संयुक्तपणे संबंधित असलेल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला १.(आजन्म कारावासाची) किंवा दहा वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व ती द्रव्यदंडासही पात्र होईल.
——-
१. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळेपाणी याऐवजी समाविष्ट केले.