भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४५६ :
रात्रीच्या वेळी केलेल्या चोरट्या गृह-अतिक्रमणाबद्दल किंवा घरफोडीबद्दल (गृह-भेदन) शिक्षा :
(See section 331(2) and (4) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : रात्रीच्या वेळी केलेले चोरटे गृह-अतिक्रमण किंवा घरफोडी.
शिक्षा :३ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जो कोणी रात्रीच्या वेळी चोरटे गृह-अतिक्रमण करील, किंवा रात्रीच्या वेळी घरफोडी करील त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.