Ipc कलम ४४८ : गृह-अतिक्रमणाबद्दल शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४४८ :
गृह-अतिक्रमणाबद्दल शिक्षा :
(See section 331 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : गृह-अतिक्रमण.
शिक्षा :१ वर्षाचा कारावास, किंवा १००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ज्यासंपत्तीबाबत अतिक्रमण झाले तिचा कब्जा असलेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी
——-
जो कोणी गृह-अतिक्रमण करील त्याला एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा एक हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply