भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४३३ :
दीपगृह किंवा सागरी धोक्याची निशाणी नष्ट करुन, ती हलवून, किंवा त्याची उपयुक्ततता कमी करुन आगळीक करणे:
(See section 326(d) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दीपगृह किंवा सागरी धोक्याची निशाणी नष्ट करुन ती हलवून किंवा त्याची उपयुक्तता कमी करुन, अथवा फसवा प्रकाश दाखवून आगळीक करणे.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
कोणतेही दीपगृह किंवा सागरी धोक्याची निशाणी म्हणून वापरला जाणारा अन्य दीप किंवा कोणतीही सागरी धोक्याची निशाणी किंवा बोया किंवा नाविकांना मार्गदर्शक म्हणून ठेवलेली अन्य वस्तू नष्ट करुन किंवा हलवून अथवा जिच्यामुळे असे कोणतेही दीपगृह, सागरी धोक्याची निशाणी, बोया किंवा अशी पूर्वोक्त अन्य वस्तू नाविकांना मार्गदर्शक म्हणून कमी उपयुक्त ठरते अशी कोणतीही कृती करुन जो कोणी आगळीक करील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.