Ipc कलम ४१३ : चोरीच्या मालमत्तेचा नित्यश: व्यवहार करणे:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४१३ :
चोरीच्या मालमत्तेचा नित्यश: व्यवहार करणे:
(See section 317(4) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : चोरीच्या मालमत्तेचा नित्यश: व्यवहार करणे.
शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
जी चोरीची मालमत्ता असल्याचे स्वत:ला माहीत असेल, किंवा तसे समजण्यास स्वत:ला कारण असेल अशी मालमत्ता जो कोणी नित्यश: स्वीकारील, किंवा तिचा व्यवहार करील त्याला, १.(आजन्म कारावासाची) किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——-
१. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची याद्वारे जन्मठेप काळेपाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply