भारतीय दंड संहिता १८६०
फौजदारीपात्र बलप्रयोग आणि हमला याविषयी :
कलम ३४९:
बलप्रयोग :
(See section 128 of BNS 2023)
एखाद्याने जर अन्य व्यक्तीच्या ठायी गती निर्माण केली किंवा गतिबदल अगर गतिविराम घडवून आणला अथवा ज्यायोगे एखाद्या पदार्थाच्या त्या अन्य व्यक्तीच्या शरीराच्या कोणत्याही भागाशी किंवा त्या अन्य व्यक्तीने परिधान केलेल्या किंवा जवळ बाळगलेल्या कोणत्याही वस्तूशी संपर्क घडेल किंवा अशा संपर्कामुळे त्या अन्य व्यक्तीचा स्पर्श संवेदनेवर परिणाम होईल अशा प्रकारे स्थित असलेल्या कोणत्याही वस्तूशी संपर्क घडेल अशा त?्हेने त्या पदार्थाच्या ठायी अशी गती निर्माण केली किंवा असा गतिबदल अगर गतिविराम घडवून आणला तर तो त्या अन्य व्यक्तीच्या बाबतीत फौजदारीपात्र बलप्रयोग करतो असे म्हटले जाते: मात्र, गती निर्माण करणाऱ्या किंवा गतिबदल अगर गतिविराम घडवून आणणाऱ्या व्यक्तीने, यात यापुढे वर्णन करण्यात आलेल्या तीन प्रकारांपैकी एका प्रकारे गती निर्माण केली असली पाहिजे किंवा गतिबदल अगर गतिविराम घडवून आणला असला पाहिजे.
एक : स्वत:चे शारीरीक सामथ्र्य वापरणे.
दोन : एखादा पदार्थ अशा स्थितीत ठेवणे, की जेणेकरुन स्वत:ला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला आणखी काही कृती करावी न लागता गती निर्माण होईल किंवा गतिबदल अगर गतिविराम घडून येईल.
तीन : कोणत्याही प्राण्याला गतिमान होण्यास, गतिबदल करण्यास किंवा गतिविराम करण्यास प्रवृत्त करणे.