Ipc कलम ३३६: इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३३६:
इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती :
(See section 125 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ज्यामुळे मानवी जीवित, इत्यादी धोक्यात येईल अशा कृतीने दुखापत पोचवणे.
शिक्षा :३ महिन्यांचा कारावास, किंवा २५० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जो कोणी मानवी जीवित किंवा इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल इतक्या बेदरकारपणे किंवा हयगयीने कोणतीही कृती करील त्याला, तीन महिन्यापर्यंन्त असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा दोनशे पन्नास रुपयांपर्यंन्त असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply