भारतीय दंड संहिता १८६०
कलम २७१ :
पृथकवासाच्या (स्वतंत्र ठेवणे) नियमाची अवज्ञा :
(See section 273 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही पृथक्वासाच्या नियमाची समजूनसवरुन अवज्ञा करणे.
शिक्षा :६ महिन्यांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
कोणतेही जलयान पृथकवास (स्वतंत्र ठेवणे) स्थितीत ठेवण्यासाठी अथवा अशा स्थितीमधील जलयानांचे किनाऱ्याशी किंवा इतर जलयानांशी जे दळणवळण राहते त्याच्या विनियमनासाठी अथवा ज्या ठिकाणी सांसर्गिक रोग फैलावला आहे ती ठिकाणे आणि इतर ठिकाणे यांच्यामधील दळणवळणाचे विनियमन करण्यासाठी १.(२.(***) शासनाने ३.(***)) केलेल्या आणि जारी केलेल्या कोणत्याही नियमांची जो कोणी जाणीवपूर्वक अवज्ञा करील त्याला, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
——–
१. अनुकूलन आदेश १९३७ द्वारे भारत सरकारने किंवा कोणत्याही शासनाने याऐवजी हे शब्द दाखल करण्यात आले.
२. अनुकूलन आदेश १९५० द्वारे केन्द्रीय किंवा कोणत्याही प्रांतिक हे शब्द वगळण्यात आले.
३. अनुकूलन आदेश १९४८ द्वारे किंवा क्राऊन रिप्रेझेंटेटिव्हने हे शब्द वगळण्यात आले.