भारतीय दंड संहिता १८६०
कलम २६६ :
खोटे वजन किंवा माप कब्जात बाळगणे :
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कपटपूर्ण वापरासाठी खोटी वजने किंवा मापे कब्जात बाळगणे.
शिक्षा :१ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जे कोणतेही तोलण्याचे साधन किंवा कोणतेही वजन किंवा कोणतेही लांबी-रूंदीचे, अगर धारकतेचे माप खोटे असल्याचे स्वत:स माहीत आहे १.(***) ते कपटीपणाने वापरले जावे अशा उद्देशाने जो कोणी ते आपल्या कब्जात बाळगील त्याला एक वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
——-
१. १९५३ चा अधिनियम ४२ – कलम ४ व अनुसूची ३ यांद्वारे आणि हा शब्द वगळण्यात आला.