Ipc कलम २५८ : नकली शासकीय मुद्रांकाची विक्री :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २५८ :
नकली शासकीय मुद्रांकाची विक्री :
(See section 179 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : नकली शासकीय मुद्रांकाची विक्री.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो मुद्रांक महसूलाच्या प्रयोजनार्थ (कारणाकरिता) शासनाद्वारे पुर:सृत (काढलेल्या) अशा कोणत्याही मुद्रांकाची नक्कल असल्याचे स्वत:ला माहीत आहे, किंवा तसे समजण्यास कारण आहे, असा कोणताही मुद्रांक जो कोणी विकेल किंवा विकत देऊ करील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply